- सद्य स्थितीत 14,589 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. काल पुन्हा एकदा 3 हजारच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी 3,548 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. तर 15 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 79 हजार 962 वर पोहचली आहे. यामधील 14 हजार 589 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 2,936 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 54 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,096 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 49 लाख 71 हजार 759 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 43,960 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,043 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.