ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 89 नवे रुग्ण आढळून आले असून 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 285 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 33 हजार 934 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 07 हजार 401 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.12 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,965 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सद्य स्थितीत 1 हजार 568 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 12 लाख 77 हजार 877 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 54,297 आरटीपीसीआर टेस्ट आणि 19,901 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 1,837 झोन आहेत.
- लसीकरणाचा डाटा
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 2, 07,557 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 1,72,659 जणांना पहिला डोस तर 34,898 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 73 लाख 36 हजार 559 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 56,35,171 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 17,01,388 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.