ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 356 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीकरांची चिंता आता आणखी वाढली आहे.
दिल्लीत आतापर्यंत 1510 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 1071 रुग्ण निझामुद्दीनमधील तबलिगी जमात मरकझशी संबंधित आहेत. दिल्लीत आतापर्यंत 28 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 30 जण या आजारातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने दिल्लीतील 43 भाग सील करण्यात आले आहेत