ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आणखी 12 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जवान एकाच बटालीयनमधील आहेत. त्यामुळे बटालीयनमधील इतर जवानांची चिंता आता वाढली आहे.
दिल्लीच्या मयूर विहार फेझ-३ येथे ही बटालियन तैनात आहे.
आतापर्यंत CRPF च्या 122 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज नव्याने 12 रुग्णांची नोंद झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बटालियन क्वारंटाईन करण्यात आले आहे. 150 जवानांचे कोरोना चाचणीचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत.
सीआरपीएफच्या 31 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद इकराम हुसेन 28 एप्रिलला कोरोनाने बळी घेतला आहे.