वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया दिल्ली कॅपिटल्स संघातील फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल, ख्रिस वोक्स तसेच विंडीजचा हेतमेयर मुंबईत सोमवारी दाखल झाले आहेत.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची सोय केली आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या स्पर्धेत खेळू शकणार नाही. गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध 10 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.