ऑनलाईन टीम / लखनऊ :
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे, या पार्श्वभूमीवर नोएडा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नोएडा प्रशासन दिल्लीतून येणाऱ्या लोकांची सीमेवर आजपासून रॅंडम रॅपिड तपासणी केली जात आहे.पाच एन्ट्री पॉइंट आणि 11 मेट्रो स्टेशनवर ही तपासणी केली जात आहे. याचे रिपोर्ट 8 ते 10 मिनिटात मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा प्रशासनाद्वारे डीएनडी फ्लायओवर, चिल्ला बॉर्डरवरून नोएडामध्ये जात असलेल्या लोकांची रॅंडम रॅपिड टेस्ट केली जात आहे. नोएडामधील सीएमओ दीपक ओहरी यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्या लोकंमामुळे नोएडामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे ते म्हणाले, गुरुवारी अशोक नगरमध्ये रॅंडम रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील आणि संबंधित व्यक्ती दिल्लीतून आली असेल तर त्या व्यक्तीला दिल्लीत आयसोलेट केले जाईल आणि जर संबंधित व्यक्ती नोएडामधील असेल तर त्या व्यक्तीस नोएडामध्ये आयसोलेट करण्यात येणार आहे.