वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या गुरुवारी झालेल्या विविध पदांच्या निवडणुकीमध्ये रोहन जेटली यांनी प्रतिस्पर्धी ऍड. विकास सिंगचा पराभव केला. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जेटली यांना 1658 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी विकास सिंग यांना 662 मते मिळाली. या निकालासह जेटली यांच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब झाले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत साहिबसिंग वर्मा यांचा चिरंजीव तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळणारा क्रिकेटपटू सिद्धार्थ वर्मा याची दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी निवड झाली. सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थने विनोद तिहाराचा पराभव केला. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या खजिनदारपदी पवन गुलाटीची नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सी. के. खन्ना यांची पत्नी शशी खन्ना यांनी आपले उपाध्यक्षपद कायम राखले.