बेळगाव / प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्यावतीने दिव्यांगांना मंगळवार दि. 1 जून रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. अळवण गल्ली, शहापूर येथील फिजिकली हॅन्डीकॅप्ड संस्थेच्या कार्यालयात दुपारी 1 ते 4 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी 9738330418 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन फिजिकली हॅन्डीकॅप्ड असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.