बेळगाव / प्रतिनिधी :
राज्य परिवहन मंडळातर्फे जेष्ठ नागरिक व दिव्यागांना वर्षभर सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. लॉकडानच्या काळात दिक्यांग क्यक्तींनी पास घेण्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे पास वितरणाचे काम थंड पडले होते. मात्र आता बससेवा सुरळीत झाली असून प्रवाशांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे बसपास मिळविण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची वर्दळ वाढलेली पहायला मिळत आहे.
दिव्यागांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून विविध सवलती पुरविल्या जातात. त्याबरोबर परिवहनतर्फे दिव्यांग क्यक्तींना प्रवास सुखकर व्हावा यासाठी सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. आठवडय़ाच्या दर बुधवारी आरटीओ सर्कल येथील परिवहनच्या संचार विभागात बसपास दिला जातो. सदर बसपासची कालावधी एक वर्ष असून 100 किलो मिटरपर्यंत दररोज प्रवास करता येतो. 60 वर्षा वरील जेष्ठ नागरिकांचे वार्धक्य सुरक्षित व्हावे, यासाठी तिकीट दरात 25 टक्के सुट देण्यात येते. तर 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेले व्यक्तींना सवलतीच्या दरात म्हणजे केवळ 660 रूपयांत वर्षभरासाठी बसपास दिला जातो. पुढे हाच बसपास दरवषी नूतनीकरण करून दिव्यांग व्यक्ती प्रवास करू शकतात.