प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्यातील दिव्यांग शाळांमधील शिक्षकांना वेळेत वेतन द्यावे. सरकारी नियमांनुसार पूर्ण वेतन द्यावे, याचबरोबर इतर समस्या सोडविण्याबाबत जिह्यातील विशेष शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
राज्यातील दिव्यांग शाळांना केवळ 50 टक्के अनुदान दिले गेले आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रतिमहिना 13 हजार 500 इतकेच वेतन आहे. शिक्षकेतर कर्मचाऱयांना केवळ 9 हजार वेतन आहे. या वेतनामधून आम्हाला जीवन जगणे कठीण जात आहे. महत्त्वाचे म्हणजे जून महिन्यापासून आतापर्यंत वेतनच देण्यात आले नाही.
दिव्यांगसारख्या शाळांमध्ये आम्ही काम करत आहे. मात्र, सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात अशा एकूण 184 शाळा आहेत. जिह्यामध्ये 14 शाळा आहेत. जिह्यातील या शाळांमध्ये 70 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. आम्हाला दिव्यांग असलेल्या मुलांना शिक्षण द्यावे लागते. त्यामुळे आमच्याबाबत समाजामधून सहानुभूती दाखविण्यात येत असली तरी सरकार मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. हिरेमठ, उपाध्यक्ष शंकर शिंदे, सेपेटरी रेणुका प्रसाद, एच. एस. जगदाळ, बी. एन. घंटी, बाहुबली संकण्णावर, आनंद कांबळे, शांता शिंदे, आर. सी. गौरी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.