वृत्तसंस्था/ देगू (कोरिया)
येथे सुरू असलेल्या 15 व्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत शुक्रवारी भारताचे नेमबाज दिव्यानेश सिंग पनवारने पुरुषांच्या कनिष्ठ 10 मी. एयर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक तर पुरुषांच्या वरिष्ठ 10 मी. एयर रायफल नेमबाजीत भारताच्या किरण जाधवने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपल्या मोहिमेला चांगला प्रारंभ केला आहे. कनिष्ठ पुरुषांच्या एयर रायफल नेमबाजी भारताच्या श्री कार्तिक शबरीराज रविशंकरने कास्यपदक मिळवले. पुरुषांच्या कनिष्ठ 10 मी. एयर रायफल नेमबाजीत दिव्यानेश सिंग पनवारने कोरियाच्या बेंग सेयुनगोचा 17-9 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. मानांकन फेरीत दिव्यानेशने 260.7 गुण नोंदवले होते. या क्रीडा प्रकारात भारताच्या श्री कार्तिक शबरीराज रवीशंकरने 258.8 गुणासह कास्यपदक मिळवले. वरिष्ठांच्या पुरुष 10 मी. एयर रायफल नेमबाजीत भारताचा नेमबाज किरण अंकुश जाधवने 262.4 गुणासह रौप्यपदक पटकावले. नेमबाजीच्या या क्रीडा प्रकारात भारताचा विद्यमान विजेता रुद्राक्ष पाटीलला चौथ्या तर अर्जुन बेबुताला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोरियाच्या पार्क हेजूनने किरण जाधव 16-10 अशा गुणांनी पराभव सुवर्णपदक घेतले.