प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ रोडवरील दि आदर्श मल्टिपर्पज सहकारी सोसायटीचा 28 वा वर्धापन दिन साजरा झाला. यानिमित्त सत्यनारायण पूजा झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिगंबर एम. राऊळ व उपाध्यक्ष एन. आर. सनदी व सर्व संचालक उपस्थित होते.
संस्थेचे ज्ये÷ संचालक एम. व्ही. परब यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष दिगंबर एम. राऊळ यांनी स्वागत करून संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. सध्या संस्थेकडे 7087 सभासद, 83.67 लाखाचे भांडवल, 65 कोटी 73 लाखाच्या ठेवी, 52 कोटी 4 लाखाची कर्जे, 21 कोटी 86 लाखाची गुंतवणूक तर गतवषी 1 कोटी 05 लाख रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली.
यावेळी संचालक एस. एम. जाधव, ए. एल गुरव, आय. वाय. मेलगे, आर. टी. पवार, ए. ए. साळवी, एल. एम. शानभाग, ए. सी. रोकडे, पी. एस. साळुंखे, सभासद बी. ओ. येतोजी, दत्ता शेनवी, उद्योजक विनायक कडोलकर, अमोल एस. जाधव, राज कडोलकर, सेपेटरी पी. बी. माळवी, सर्व कर्मचारी, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. एम. व्ही. परब यांनी केले. संचालक एन. वाय. कंग्राळकर यांनी आभार मानले.