अभिनेत्री दीपिका पदुकोण चार वर्षांच्या कालखंडानंतर हॉलिवूडमध्ये पुनरागमन करीत आहे. तिने काही दिवसांपूर्वी आपल्या हॉलिवूड प्रकल्पाची घोषणा केली होती. लवकरच ती एका रोमँटिक कॉमेडी फिल्ममध्ये दिसेल. पिका या कंपनीची ही फिल्म 550 कोटी रुपयांमध्ये तयार होणार आहे. ही एक आकर्षक फिल्म असेल आणि तिचे शूटिंग न्यूयॉर्क तसेच भारतातील काही निसर्गरम्य ठिकाणी होईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पावर काही ज्ये÷ अभिनेत्यांसमवेत चर्चा सुरू असल्याचे दीपिकाने स्पष्ट केले आहे.
एसटीएक्स मोशन पिक्चर ग्रुपचे अध्यक्ष ऍडॅम फोगलसन या चित्रपटाचे निर्माते असतील. इरॉस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशन द्वारा ही फिल्म तयार केली जाईल. दीपिका पादुकोण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.