प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील अजमेरीनगर येथे दुकान फोडून चोरटय़ाने आतील 9 हजार रूपयांचा मुद्देमाला लांबवल़ा ही घटना रविवारी रात्री 9 च्या सुमारास घडल़ी याप्रकरणी शौकत अहमद सोलकर (64, ऱा किर्तीनगर रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत सोलकर याचे अजमेरीनगर मजगांव रोड येथे मालकीचे दुकान आह़े रविवारी रात्री 9 च्या सुमारास अज्ञात चोरटय़ाने या दुकानाचा पत्रा उचकटून आतील 9 हजाराचा मुद्देमाल लांबवल़ा यामध्ये 7 हजार रूपयांची बॅटरी व 2 हजार रूपयांची रोकड चोरीला गेल़ी अशी तक्रार सोलकर यांनी दाखल केली आह़े याप्रकरणी शहर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े