खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दुचाकी चोरल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी शनिवारी उज्वलनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या जवळून एक होंडा ऍक्टीव्हा जप्त करण्यात आला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. आय. देवडी, शंकर शिंदे, व्ही. एस. कुंगारे, बी. पी. उज्जीनकोप्प, जी. पी. अंबी आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
तौसीफ रियाज निजामी (वय 24, रा. उज्वलनगर) असे त्याचे नाव आहे. तौसीफ हा टाईल्स फिटींगचे काम करतो. 16 सप्टेंबर 2018 रोजी काकतीवेस परिसरात उभी करण्यात आलेली केए 22 ईक्मयु 5867 क्रमांकाची होंडा ऍक्टीव्हा चोरीला गेली होती. यासंबंधी 29 ऑक्टोबर 2018 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात विवेक नारायण लक्केबैलकर (रा. देसूर) याने फिर्याद दिली होती. दोन वर्षांनी चोरीच्या दुचाकीचा शोध लागला आहे.