श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवषी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. यामध्ये हजारोंच्या संख्यने लहान मुलांसह तरुण, तरुणी आणि वृद्ध देखील सहभाग घेत असतात. दसऱयामध्ये सलग 9 दिवस ही दौड काढली जाते. मागील वषी कोरोनामुळे मोजक्मयाच धारकऱयांच्या उपस्थितीत दौड काढण्यात आली होती. मात्र यावषी कोरोना कमी झाला असून आम्हाला दौड काढण्यास परवानगी द्या, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
नवरात्रामध्ये ही दौड असते. मोठय़ा भक्तीभावाने देवदेवतांचा जयघोष करत ही दौड काढली जाते. यावषी गुरुवार दि. 7 ते 15 ऑक्टोबरपर्यंत दौड काढली जाणार आहे. सकाळी 6 ते 8.30 पर्यंत ही दौड संपूर्ण शहरामधून काढण्यात येणार आहे. तरी आम्हाला या दौडसाठी परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन भक्तीभावाने पूजाअर्चा करून आरती म्हटली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावमध्ये ही परंपरा आहे. युवकांना एक वेगळी प्रेरणा मिळते. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला दौड काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून निर्णय देऊ, असे आश्वासन दिले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, विश्वनाथ पाटील, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, अंकुश केसरकर, कल्लाप्पा पाटील यांच्यासह धारकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस उपायुक्तांनाही निवेदन
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनीही परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. प्रशासनाबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही तुम्हाला निर्णय कळवू, असे त्यांनी सांगितले.