प्रतिनिधी/ बेळगाव
दुसरे रेल्वेगेट अचानक कोसळल्याची घटना सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. सुदैवानेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. वाहनचालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या या रेल्वेगेटचे काम सुरू आहे. मात्र रेल्वेगेट जुने व गंजलेले होते. त्यामुळे ते अचानक कोसळले.
सायंकाळच्या वेळी रहदारी होती. मात्र आवाज आल्यामुळे सुदैवाने साऱयांनीच आपली वाहने थांबविली. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. अशा प्रकारे वारंवार गेट कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तेव्हा रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.