सेक्सेन्स 19 अंकांनी प्रभावीत- बँकिंगमध्ये सर्वाधिक विक्री
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजाराचा तेजीचा प्रवास मागील सहा दिवसांपासून कायम राहिला होता. ही स्थिती केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापासून कायम राहिल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु जागतिक पातळीवरील आणि देशातील उद्योग क्षेत्रातील बदलत्या वातावरणामुळे शेअर बाजार चालू आठवडय़ातील दुसऱया दिवसांपासून घसरणीत राहिला आहे. तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 19.69 अंकांनी प्रभावीत होत 51,309.39 वर बंद झाला आहे. ट्रेडिंगदरम्यान बुधवारी काही काळ सेन्सेक्सचा निर्देशांक 666 अंकांवर घसरुन 50,846.22 वर पोहोचला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 2.80 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,106.50 वर बंद झाला आहे. बाजारात जागतिक पातळीवरील मंदीचा प्रभावही देशातील शेअर बाजारातील कामगिरीवर राहिला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
बुधवारच्या सत्रात बीएसईमधील 3,125 समभागात ट्रेडिंग झाले आहे. यातील 1,464 समभाग वाढीसोबत आणि 1,498 समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत. लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्यही वाढून 203.04 लाख कोटींच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे.
चालू आठवडय़ातील मंगळवारी मात्र इंटरग्लोब एव्हिएशनने सेबीसोबत एका प्रकरणासाठी तडजोड केली होती. यामुळे कंपनीने 2 कोटी 10 लाख 37 हजार 500 रुपयांची रक्कम जमा केली होती. इंडिगोनेही काही दिवसांपूर्वी सेटलमेंट करण्यासाठी सेबीकडे अर्ज केला होता.
बँकिंग समभागात सर्वाधिक विक्री
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरणीमध्ये बुधवारी एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल राहिले आहेत. दुसऱया बाजूला बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग 2.2 टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले आहेत.