कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक मजबूत : निफ्टी 11,889.40 वर
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स मोठय़ा अंकांच्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय व स्थानिक घडामोडींचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात राहिला होता. परंतु घसरणीचा प्रभाव दुसऱया दिवशी मंगळवारी न राहता गमावलेली तेजी परत मिळवत सेन्सेक्स 376.60 अंकांच्या मजबूतीसह बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीत कोटक महिंद्रा बँकेचे समभाग तब्बल 12 टक्क्यांनी वधारले असून याचा सकारात्मक परिणाम देशातील भांडवली बाजारावर राहिल्याचे दिसून आले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 376.60 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 40,522.10 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 121.65 अंकांनी वधारुन 11,889.40 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत कोटक महिंद्रा बँकेचा तिमाही (जुलै ते सप्टेंबर) अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये बँकेला निव्वळ 22 टक्क्यांचा लाभ होत 2,947 कोटींवर नफा राहिला आहे. याचा प्रभाव म्हणून बँकेच्या समभागांनी मंगळवारी 12 टक्क्यांच्या मजबूतीने उसळी घेतली आहे. सोबत बँकेने इंडसइंड बँकेच्या अधिग्रहणासह अन्य घटनांचाही परिणाम झाला आहे. एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माहितीनुसार कर्जामध्ये हलक्या प्रमाणात वृद्धी झाल्यानेच कोटक बँपेला योग्य लाभ झाल्याची नोंद केली आहे. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स, एनटीपीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍक्सिस बँक आणि बजाज ऑटो आदींचा समावेश आहे. दुसऱया बाजूला टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस, एचडीएफसी आणि स्टेट बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवर हाँगकाँग, सियोल आणि टोकीयो आदी बाजारात घसरण राहिली आहे. चीनच्या शांघायमध्ये तेजी राहिली होती. तसेच युरोपमधील प्रमुख बाजारात प्रारंभी घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले होते.