वृत्तसंस्था/ लंडन
विम्बल्डन ग्रँडस्लॅम यावेळी रद्द करण्यात आले असून दुसऱया महायुद्धानंतर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. कोरोना व्हायरसने जगभर प्रचंड धुमाकूळ घातल्याने अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या असून त्यात आता विम्बल्डनचीही भर पडली आहे. पुढील वर्षीची स्पर्धा 28 जून ते 11 जुलै या कालावधीत घेण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
ग्रास कोर्टवरील एकमेव ग्रँडस्लॅम असलेली विम्बल्डन स्पर्धा रद्द झाल्याने टेनिस मोसमच विस्कळीत झाले आहे. पेंच ओपन स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली आहे तर 7 जूनपर्यंतच्या सर्व टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. विम्बल्डन स्पर्धा 29 जूनपासून सुरू होणार होती. नोव्हॅक जोकोविच व सिमोना हॅलेप हे या स्पर्धेचे विद्यमान विजेते आहेत. बुधवारी या स्पर्धेच्या आयोजकांची बैठक झाली आणि त्यात स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. जगभरात आजवर साडेआठ लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे विम्बल्डनआधी होणाऱया छोटासा ग्रासकोर्ट मोसमही रद्द केला जाणार असल्याची चर्चा करण्यात आली. बंद दरवाजामागे विम्बल्डन खेळण्याची संकल्पना याआधीच फेटाळून लावली होती आणि स्पर्धा लांबणीवर टाकली तर आणखी वेगळय़ा समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते.
तीनवेळा ही स्पर्धा जिंकलेल्या जर्मनीच्या बोरिस बेकरने, अंतिम निर्णय घेण्याची इतक्यात घाई करू नये, असा सल्ला प्रमुखांना दिला होता. एप्रिल अखेरपर्यंत त्यांनी प्रतीक्षा करावी. स्पर्धा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. त्यामुळे संयम बाळगावा, असे त्याने ट्विट पेले होते.
या स्पर्धेला पोषक वातावरण याच सुमारास मिळत असल्याने ती लांबणीवर टाकणे योग्य ठरणार नाही. उन्हाळय़ात किंवा हिवाळय़ाच्या प्रारंभी त्याचे आयोजन करणे शक्य होणार नाही. कारण त्यावेळी दिवस लहान होत असल्याने टेनिस खेळण्यासाठी पुरेसा उजेड मिळणार नाही.