अनेक कारणांमुळे आपल्यावर एकटं राहण्याची वेळ येते. नोकरीत बदली झाल्यामुळे किंवा पती सतत फिरतीवर असल्यामुळे एकटं रहावं लागतं. हा एकटेपणा बरेचदा त्रासदायक ठरतो. अनेकींना निराश, उदास वाटू लागतं. मात्र या एकटेपणाचा सदुपयोग करून कंटाळा घालवता येईल.
- एकटेपणा दूर करण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी इतरांना मदत करा. तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात जाऊन वेळ घालवू शकता. ज्येष्ठांशी बोला, मुलांसोबत खेळा. यामुळे तुम्हालाही मानसिक समाधान मिळेल.
- एखाद्या ग्रुपशी जोडले जा. एकत्रितपणे काही ऍक्टिव्हिटी करा. एखाद्या कार्यशाळेत सहभागी व्हा. शिबिरात जा. सामाजिक संस्था, संघटनेसोबत काम करा. लोकांशी ओळखी वाढवा.
- नोकरी किंवा शिक्षणानिमित्त घरापासून लांब रहाण्याची वेळ आली तर कुढत बसू नका. ऑफिसमधल्या सहकार्यांशी गप्पा मारा. सगळ्यांशी मिळून मिसळून रहा. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. सणवार एकत्र साजरे करा.
- वाचनाचा छंद जोपासा. पुस्तकांशी मैत्री करा. चांगली पुस्तकं तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवतील. आत्मचरित्र वाचा. यामुळश तुम्हाला बळ मिळेल.
- रोजचा कंटाळा घालवण्यासाठी कामात विविधता आणण्याचा प्रयत्न करा. एकच काम वेगळ्या पद्धतीने करा. यामुळे तुम्हाला नाविन्याची अनुभूती मिळेल.