प्रतिनिधी / मडगाव
अनेकदा आपण आपल्या मित्रावर नाहक विश्वास ठेवतो आणि तोंडघशी पडतो. अशीच एक घटना कोलवा परिसरात घडलेली आहे.
हावेरी -कर्नाटक येथील एक 33 वर्षांची महिला. या प्रकरणातील ही संशयित महिला. श्रीमती मारिया नावाच्या कोलवा परिसरातील एका महिलेकडे तिची मैत्री जमली. मारिया हिचाही तिच्यावर विश्वास बसला आणि एक दिवस कर्नाटकातील या महिलेने परत आणून देतो असे सांगून 9 लाख रुपये किंमतीचे दागिने नेले. जानेवारी 2020 ते जून 2020 दरम्यान ही घटना घडली.
आज देतो उद्या देतो असे करता -करता शेवटी ती या कोलवा येथील या महिलेला टाळू लागली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून कोलवा परिसरातील मारिया नावाच्या या महिलेने शेवटी कोलवा पोलिसांकडे मदतीचा हात मागितला.
कोलवा पोलिसांनी संशयित आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संतिहेच्या 420 कलमाखाली (फसवणूक करणे) गुन्हा नोंद केला असून तपास चालू आहे.