शाहूनगर, कंग्राळी बुद्रुक परिसरात मोहीम
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी शाहूनगर, कंग्राळी बुद्रुक परिसरात भग्न देवदेवतांची छायाचित्रे जमविण्याची मोहीम राबविली. स्थानिक नागरिकांनीही त्यांना साथ दिली.
शाहूनगर व कंग्राळी बुद्रुक दरम्यान असलेल्या नाल्याजवळ मोठय़ा प्रमाणात भग्न छायाचित्रे टाकून देण्यात आली आहेत. त्याची माहिती मिळताच वीरेश हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी या परिसरात मोहीम राबविली. त्यांना मोरया ग्रुप, राम निलजकर, यल्लोजी पाटील, भरतेश पाटील, एम. आर. पाटील, परशराम बसरीकट्टी, सुनील कोळी, मारुती कोळी, राम हुरुडे, मोहन भैरटकर आदींसह स्थानिक नागरिकांनी साथ दिली.
नाल्याला लागूनच मोठय़ा प्रमाणात देवदेवतांची भग्न झालेली छायाचित्रे व इतर वस्तू टाकून देण्यात आल्या आहेत. भग्न देवदेवतांची छायाचित्रे उघडय़ावर टाकू नका यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून वीरेश व त्यांच्या सहकाऱयांनी जागृतीचा कार्यक्रम हाती घेतला असून जमा केलेली छायाचित्रे रितसर होम करून विसर्जित केली जातात..