प्रयागराज
समाजमाध्यमांवर हिंदू देवी-देवतांबद्दल अश्लील आणि अभद्र चित्रफित प्रसारित करणारी यूटय़ूबर हीर खानला पोलिसांनी गुन्हा नोंद झाल्याच्या 24 तासांतच अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी खुल्दाबाद पोलीस स्थानकात हीर खानच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत सोमवारी गुन्हा नोंदविला होता. यूटय़ूबर हीर खानला तिच्या घरातूनच अटक करण्यात आली आहे. खुल्दाबाद पोलीस स्थानकात हीर खानची कसून चौकशी केली जात आहे. यूटय़ूबवर पोस्ट करण्यात आलेल्या चित्रफितीत हीर खानने हिंदू देवी-देवतांबद्दल अश्लील टिप्पणी केली होती. यूटय़ूबवर टाकण्यात आलेल्या चित्रफितीत हीर खानने 3 मिनिटे 58 सेकंदांपर्यंत हिंदू देवी-देवतांना शिविगाळ केली होती. 28 वर्षीय हीर खानच्या जुन्या चित्रफितीही पडताळून पाहिल्या जाणार आहेत.