मुंबई \ ऑनलाईन टीम
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी आंबेघरमधील विस्थापित गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी गावकऱ्यांसोबत जेवणही केलं. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
”एकीकडे महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जाहीर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास. खरंच चित्रं खूप बोलकी असतात,” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठाकरे सरकारव निशाणा साधत असतात. आज देखील त्यांनी यावेळी फडणवीस आणि दरेकरांचा फोटो शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.