वार्ताहर / नंदगड
हल्याळ येथील देशपांडे ट्रस्टच्यावतीने बैलहोंगल विधानसभा मतक्षेत्रातील कोरोना वारियर्स आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोरोना संबंधित साहित्याचे वाटप करण्यात आले.
राज्याचे माजी मंत्री व हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते सदर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, माजी जि. पं. सदस्य शंकर होळी, माजी जि. पं. सदस्य बाबासाहेब पाटील आदीसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून बैलहोंगल तालुका प्रशासनाकडे मेडिसिन किट, ऑक्सीमिटर व एन मास्क ही सुपूर्द करण्यात आले.