नवी दिल्ली
उत्सवी काळ व कोरोनाचे कमी झालेले रुग्ण या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान फेऱयांच्या संख्येत ऑक्टोबरमध्ये वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीच्या प्रमाणात 67 टक्के वाढ ऑक्टोबर महिन्यात नोंदली गेली आहे. इक्राने ही माहिती दिली आहे. रेटिंग एजन्सीनुसार ऑक्टोबरमध्ये 87 ते 88 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये 52 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला होता.