ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. देशात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 69 हजार 652 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 977 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 28 लाख 36 हजार 926 वर पोहचली असून, मृतांची संख्या 53 हजार 866 एवढी आहे.
सध्या देशात 6 लाख 86 हजार 395 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 3 कोटी 26 लाख 61 हजार 252 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 18 हजार 470 रुग्णांची तपासणी बुधवारी एका दिवसात करण्यात आली.