ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील पाच दिवसानंतर दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यात घट झाली आहे. रविवारी 3 लाख 66 हजार 161 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 3754 रुग्णांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. मागील 24 तासात 3 लाख 53 हजार 818 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात आतापर्यंत 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 86 लाख 71 हजार 122 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 37 लाख 45 हजार 237 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 46 हजार 116 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत 17 कोटी 01 लाख 76 हजार 603 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.