ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी देशात 97 हजार 570 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1201 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 46 लाख 59 हजार 985 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 77 हजार 472 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 58 हजार 316 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 36 लाख 24 हजार 197 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 5 कोटी 51 लाख 89 हजार 226 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 91 हजार 251 रुग्णांची तपासणी शुक्रवारी एका दिवसात करण्यात आली.