ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 11 हजार 610 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 100 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 09 लाख 37 हजार 320 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 55 हजार 913 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 89 लाख 99 हजार 230 लोकांना लस देण्यात आली आहे.
मंगळवारी 11,833 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 44 हजार 858 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 36 हजार 549 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 20 कोटी 79 लाख 77 हजार 229 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 44 हजार 931 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.16) करण्यात आल्या.