प्रतिनिधी/ बेळगाव
अनोळखी युवकाने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी देसूर रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सुमारे 35 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या युवकाने आपल्या अंगावर पिवळे टी-शर्ट, हिरवी हाफ पँट परिधान केली असून त्याच्या पायात स्लीपर आहेत.
हा तरुण याच परिसरातील आहे की आणखी कोठला? याची माहिती मिळविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पोलिसांनी एक मोबाईल ताब्यात घेतला असून मोबाईलवरून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.