ऑनलाईन टीम / देहरादून :
देहरादून येथील प्राचीन असलेल्या टपकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना मंदिराचे महंत कृष्ण गिरी महाराज यांनी सांगितले की, प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत मंदिर बंद करण्यात आले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाविकांना मंदिरात कोणीही येऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच घरी राहूनच पूजा करावी असेही सांगितले आहे.