नांदोशी येथील घटना, बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या ट्रँक्टरवर कारवाई करण्याची मागणी
औंध / प्रतिनिधी
ऊस वाहतूक ट्रँक्टरची बेफिकिरीने वाहतूक करणे सामान्य वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. नांदोशी येथे औंधकडून ऊस वाहतूक करणार्ऱ्या ट्रॅकटरने घाटमाथ्याकडून येणाऱ्या टेंपोला जोरदार धडक दिली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी टम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत औंध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि 31 रोजी दुपारी 3:30 वाजता नांदोशी गावच्या पुढे कराडहून खटावकडे माल घेऊन जाणारा MH-11- M -4582 टेम्पोला औंधकडून बेदरकारपणे भरधाव वेगाने ऊस भरून येणारा ट्रक्टर MH- 23 – 8631 जोरदार धडक दिल्याने आयशर टम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नसली तरी टेम्पोचा ड्रायव्हर बालबाल बचावल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. या अपघाताची औंध पोलीस स्टेशनला नोंद झाली असून सपोनि उत्तम भापकर अधिक तपास करीत आहेत.