मिरजेतील घटना, दोघांना अटक, दोन दिवस पोलिस कोठडी
मिरज / प्रतिनिधी
गोळ्या-बिस्कीट विक्री व्यवसायातील दोनशे रुपये येणे-बाकीवरुन वाद होऊन दोघा मित्रांनी इचलकरंजी येथील गुंडाचा लोखंडी सळईने गळा दाबून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. योगेश हणमंत शिंदे (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नांव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी संगिता योगेश शिंदे (वय 30) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर) व प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, गजानन हॉटेल जवळ, मिरज) या दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.