प्रतिनिधी/पणजी
गोवा पोलीस खात्यात काम करणाऱया दोन आयपीएस पोलीस अधिकाऱयांना बढती दिल्याचा आदेश केंद्रीय गृहखात्याने जारी केला आहे. गोवा पोलीस खात्याच्या मुख्यालयातच झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी बढती मिळालेल्या दोन्ही अधिकाऱयांचे अभिनंदन केले.
पोलीस मुख्यालयात साहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करीत असलेले राजेश कुमार (2003 बॅच) यांना बढती पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. तसेच दक्षिण गोवा अधीक्षक म्हणून काम करीत असलेले पंकज कुमार सिंग (2008 बॅच) यांना ज्येष्ठ अधीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे.