प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले असून या मध्ये विकास मुरलीधर मुळे (मंगळवार पेठ सातारा) आणि विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.
दोघांच्याकडून दहा चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या पथकाने केली आहे.