केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – पेट्रोल-डिझेल वाहनांसोबत किमती राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकार इलेक्ट्रिक कारची विक्री वाढविण्यासाठी विविध टप्प्यांवर प्रयत्न करत आहे. यामध्ये विविध योजनांसह सदरच्या वाहनांवर सबसिडी देण्यात येत आहे. यामुळे आगामी दोन वर्षांनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या पेट्रोल-डिझेल वाहनांच्या बरोबरीत राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक वाहने चालविण्यासाठी पेट्रोल वाहनांच्या तुलनेत कमी आहेत. यामुळे येत्या काळात ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
ई-वाहनांवर जीएसटी फक्त 5 टक्के
इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी हा 5 टक्के आकारण्यात आला असून यामध्ये पेट्रोलच्या वाहनांवर मात्र 48 टक्के जीएसटी दर आकारण्यात आला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वधारत असून भविष्यात लिथियमच्या उत्पादनांच्या किमती कमी राहणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यामुळे येणाऱया काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत मोठी घसरण नेंदवली जाणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले आहेत.
लिथियम बॅटरीचे अधिकचे उत्पादन देशातच
लिथियम बॅटरीच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात असून यामध्ये लिथियम बॅटरीचे सर्वाधिक म्हणजे 81 टक्के उत्पादन देशामध्येच घेतले जात आहे. स्वस्त बॅटरी कशा प्रकारे उपलब्ध करता येईल यासाठी संशोधन सुरु आहे. याकरीता 2030 पर्यंत 30 टक्के खासगी कार, 70 टक्के व्यावसायिक कार आणि 40 टक्के बसेस इलेक्ट्रिक करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
चार्जिंग केंद्रांचे काम
भारत हा इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाचे केंद्र आहे. बजाज व हिरो यासारख्या भारतीय दुचाकी कंपन्यांनी 50 टक्के ई वाहनांची निर्यात केली आहे. यामुळे आगामी काळात देशात हजारो चार्जिंग केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून रस्त्यांसोबत बाजारातील ठिकाणांवर 350 चार्जिंग केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.