वडगाव येथे भर रस्त्यावर घडली घटना, कटरने केला हल्ला, आरोपीला केली अटक
प्रतिनिधी /बेळगाव
रेडियम कटरने हल्ला करुन गवंडी कामगाराचा खून करण्यात आला. सोमवारी सकाळी भर रस्त्यात ही घटना घडली असून घटनेनंतर केवळ काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. केवळ दोन हजार रुपयांसाठी झालेल्या भांडणातून हा खून झाला.
महादेव मारुती जाधव (वय 50, मूळचा रा. आंबेवाडी, सध्या रा. हमालवाडा, भारतनगर, सहावा क्रॉस-शहापूर) असे खून झालेल्या गवंडी कामगाराचे नाव आहे. सुरज पुंडलिक केदारीचे (वय 35, रा. नाझर कॅम्प-वडगाव) याने कटरने हल्ला करुन महादेव याचा खून केला. येळ्ळूर रोड-वडगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ऑटोरिक्षा स्टॅन्डजवळ सकाळी 9.15 वाजता ही घटना घडली. आर्थिक व्यवहारातून सोमवारी सकाळी महादेव व सुरज यांच्यात वादावादी झाली. वादावादीनंतर कटरने गळय़ावर वार करण्यात आला. घाव वर्मी लागल्याने महादेव यांचा मृत्यू झाला.
महादेव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा भाचा संदीप मारुती कुंदेकर (रा. भारतनगर, सहावा क्रॉस-शहापूर) याने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना घडली त्यावेळी जवळच शहापूर पोलिसांचे उपनगरात गस्त घालणारे एक वाहन त्याच परिसरात होते.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी महादेवचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. कटरने हल्ला केल्यानंतर आरोपी फरारी झाला. सुरूवातीला खून कोणाचा झाला व कोणी केला? याची माहिती मिळविणे तपास अधिकाऱयांना कठीण झाले होते.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव जाधव हे गवंडी काम करत होते. आंबेवाडी हे मूळगाव असले तरी कामानिमित्त ते शहापूरला बहिणीकडे रहायचे. त्यांची पत्नी व मुले गावाकडे असतात. सोमवारी सकाळी महादेव व आरोपी सुरज यांच्यात वादावादी झाली. वादावादीनंतर कटरने गळय़ावर वार करण्यात आला. यात महादेव यांचा मृत्यू झाला.
कामावरील पैशासाठी….
खून झालेला महादेव व आरोपी सुरज हे दोघे मोहन मेस्त्राr यांच्याकडे गवंडी काम करत होते. शनिवारी मोहन मेस्त्राrने त्यांना पगारापोटी प्रत्येकी 2 हजार रुपये दिले. महादेव यांचा पगारही सुरजने आपल्याकडे घेतला. आपण महादेव यांना पोहोचवू, असे सांगितले होते. दोन दिवस सुरजने पैसे दिले नाही म्हणून सोमवारी सकाळी यात्रेसाठी पैसे आणायला महादेव सुरजच्या घरी गेला. सुरजचे वडील अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या समोरच पैशासाठी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी वडील आजारी आहेत. घराबाहेर चल, बोलू, असे सांगत त्याने महादेव यांना बाहेर नेले. उभयतांत वादावादी होवून किरकोळ हाणामारी झाली. हाणामारीनंतर रेडियम कटरने महादेव यांच्या गळय़ावर हल्ला करण्यात आला. यावेळी रक्तस्राव होवून महादेवचा जागीच मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.