कोरोना विषाणू द्रव पृष्ठभागाला चिकटून जिवंत राहतो, असा दावा आयआयटी पवईने स्वतःच्या संशोधनानंतर केला आहे. संशोधनानुसार हा विषाणू ठोस पृष्ठभागावर अनेक तासापर्यंत जिवंत राहू शकतो. ‘फिजिक्स ऑफ फ्लूइड्स’ नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे श्वसनावाटे बाहेर पडणारे सामान्य ड्रॉपलेट्स काही सेकंदांमध्ये कोरडे होतात, परंतु विविध पृष्ठभागांवर असलेला कोरोना काही तासांपर्यंत जिवंत राहतो. नॅनोमीटरयुक्त द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावर संशोधन करण्यात आले आहे. हा विषाणू पृष्ठभागावर चिकटून राहत असल्याने तो अनेक तास जिवंत राहत असल्याची माहिती आयआयटीचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज यांनी दिली आहे. कुठल्याही पृष्ठभागावर पातळ पापुद्रा असणे आणि त्याचा कोरडेपणा हा विषाणू कितीकाळ जिवंत राहणार हे निश्चित करत असल्याचे प्राध्यापक अमित अग्रवाल यांनी म्हटले आहे.