वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट सुपर लीग स्पर्धेतील नेदरलँड्स बरोबर (हॉलंड) होणाऱ्या अंतिम दोन सामन्यांसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 15 जणांचा संघ जाहीर केला असून रबाडा आणि नॉर्त्जे यांचे पुनरागमन झाले आहे.
आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट सुपर लीग स्पर्धेच्या गुणातक्त्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 78 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. आता या स्पर्धेतील त्यांचे नेदरलँड्स संघाबरोबरचे महत्त्वाचे दोन सामने खेळविले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांना आणखी 20 मानांकन गुण मिळतील. आणि दक्षिण आफ्रिकेला सध्या आठव्या स्थानावर 88 गुणांसह असलेल्या विंडीज संघाला मागे टाकता येईल. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील पहिला सामना बेनोनी
येथे 31 मार्चला तर दुसरा सामना 2 एप्रिलला जोहान्सबर्ग येथे खेळविला जाईल.
दक्षिण आफ्रिका संघ – बवुमा (कर्णधार), डी कॉक, फॉर्च्युन, हेंड्रीक्स, जेनसेन, क्लासेन, मगाला, मार्करम मिलर, एन्गिडी, नॉर्त्जे, पार्नेल, रबाडा, शम्सी आणि व्हॅन डेर ड्यूसेन.