वृत्तसंस्था/ लंडन
पॉल स्टर्लिंगच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर लॉर्डस् मैदानावर शनिवारी सदर्न ब्रेव्ह संघाने बर्मिंगहॅम फिनिक्सचा 35 धावांनी पराभव करून पहिल्या द हंड्रेड पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. स्टर्लिंगने या सामन्यात 36 चेंडूत 6 षटकारांसह 61 धावा झोडपल्या.
पुरूषांच्या द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेतील सदर्न ब्रेव्ह संघाने पहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेतील अंतिम सामना सदर्न ब्रेव्ह आणि बर्मिंगहॅम फिनिक्स यांच्यात खेळविण्यात आला. इंग्लंडमध्ये ही पहिली 100 चेंडूंची द हंड्रेड स्पर्धा खेळविली गेली. या अंतिम सामन्यात आयर्लंडच्या स्टर्लिंगकडून नोंदविलेल्या अर्धशतकाला रॉस व्हिट्टेलीची साथ मिळाली. व्हिट्टेलीने 19 चेंडूत नाबाद 44 धावा झोडपल्या. सदर्न ब्रेव्हने बर्मिंगहॅम फिनिक्सला विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले होते.
बर्मिंगहॅम फिनिक्सतर्फे लिव्हिंगस्टोनने 19 चेंडूत 46 धावा जमविल्या. लिव्हिंगस्टोनला डेव्हिडने धावचीत केले. लिव्हिंगस्टोनच्या खेळामध्ये चार चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. बर्मिंगहॅम फिनिक्स संघाचे नेतृत्व मोईन अली करीत होता. मोईन अली 15 धावावर बाद झाला. बर्मिंगहॅम फिनिक्सला सदर्न ब्रेव्हचे आव्हान पेलविले नाही आणि त्यांना अखेर 32 धावांनी पराभव पत्करावा लागला.
फोटो -22 एसपीओ 08-विजेत्या ओव्हल इन्व्हिन्सिबल्सच्या खेळाडू
महिलांमध्ये ओव्हल इन्व्हिन्सिबल्स विजेते
महिलांच्या द हंड्रेड या स्पर्धेचे जेतेपद ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने सदर्न ब्ा्रsव्हला 73 धावांत गुंडाळले. 122 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सदर्न ब्रेव्हची स्थिती 6 बाद 14 अशी झाली होती. नंतर त्यांनी कशीबशी 73 धावांपर्यंत मजल मारल्याने ओव्हलने हा सामना 48 धावांनी जिंकला. या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओव्हल इन्व्हिन्सिबल्स संघाने 100 चेंडूत 6 बाद 121 धावा जमविल्या. होत्या. निकर्कने 26, विल्सनने 25, केपने 4 चौकारांसह 26, कॅप्सेने 12 चेंडूत 18 धावा जमविल्या. निकर्क व विल्सन यांनी 56 धावांची भागीदारी केली होती.