ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. महाराष्ट्रात एका दिवसात कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. काल एका दिवसात 9518 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 10 हजार 455 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
काल एका दिवसात एकूण 3906 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 69 हजार 569 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के इतके आहे. तर राज्यात एकूण 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कालच्या दिवसात 258 जणांचा मृत्य झाला. तर आतापर्यंत 11, 854 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.82 टक्के इतका आहे.
- मुंबईत कोरोना ग्रस्तांचा आकडा 1,01,224
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही मोठी असून, गेल्या 24 तासात 1 हजार 46 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 1,01,224 इतका झालाा आहे. तरआतापर्यंत एकूण 5,711 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 23 हजार 828 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती बृह्नमुंबई महापालिकेनं दिली आहे.