कुंभोज / वार्ताहर
धनगर समाजाची एस. टी. आरक्षण अंमलबजावणी त्वरित करा, त्यानंतर महाराष्ट्रात होणारी मेगा भरती लवकरात लवकर करा , या मागण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीण काकडेसाहेब यांचे नेतृत्वाखाली आज मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी राज्यभर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आल्याची माहिती महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.शंकरराव पुजारी यांनी दिली.
धनगर समाज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजेबाबत सरकार का गप्प आहे, हे समजत नाही, धनगर समाजातील विध्यार्थ्यांच्या जात पडताळणीची प्रकरणे त्वरित निकालात काढावी. दुग्धोत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंढीला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळावा. अहिल्यादेवी व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा. धनगर समाजातील मंढपाळांना वने आरक्षित करून पास उपलब्ध करून द्यावेत, धनगर समाजाचा घोंगडी बनविणे हा एक मुख्य व्यवसाय आहे. मात्र, आज अनेक कारणांनी हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे त्याला सरकारने मदत करावी, अशा आशयाचे निवेदन शासनाकडे देण्याचा हा पहिला टप्पा होता.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव पुजारी, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. मंगेश हजारे, जिल्हा संघटक प्रा. राजेंद्र कोळेकर सर, उद्योजक निवासराव वाटेगावकर, ओंकार कोळेकर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मंगेश दादू हजारे, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तानाजी बोडके,संभाजी बनकर, इंद्रजीत बोडके, संदीप वाळकुंजे, इंद्रजीत बोडके, निलेश वाळकुंजे, युवराज पुजारी, संग्राम लांडगे आणि समाज कार्यकर्ते उपस्थित होते.