प्रतिनिधी / आटपाडी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्री दत्तात्रय भरणे व बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखालील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने पुणे येथे भेट घेतली. यावेळी धनगर समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
युवा उद्योजक विनायकराव मासाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजू जानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव प्रा. नारायण खरजे, जगन्नाथ जानकर, राजू अर्जून, मदन कातुरे, डाॅ .रविंद्र नाळे, आनंद ढवळे, प्रदिप कोळेकर, रियाजभाई शेख व मान्यवर उपस्थित होते.