गुजरातमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका : आरोग्य प्रभासनाचा उपक्रम
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीला खीळ घालण्यासाठी करण्यात आलेला ‘धन्वंतरी रथा’चा प्रयोग यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर, रुग्णवाहिका, औषधे, परिचारिका यांच्यासह सुसज्ज असलेल्या या रथामध्ये कोरोनाबाबत आवश्यक तपासणी आणि उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शहरातील विविध विभागांमध्ये सर्दी-खोकला आणि तापासह कोरोनावर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.
राज्यात वाढत चाललेले रोगराईचे प्रमाण पाहता रुग्णालयात जाणाऱयांसाठी ‘धन्वंतरी रथा’ची निर्मिती करण्यात आली आहे. हा रथ अहमदाबादमधील 19 विभागामध्ये फिरून रोग्यांवर उपचार करण्यास मदत करत आहे. मात्र, 17 ते 26 मेच्या दरम्यान ‘धन्वंतरी रथा’मधून रुग्णालयात येणाऱयांची संख्या कमी झाली असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. हा रथ म्हणजे रुग्णवाहिकेचाच एक प्रकार आहे. यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात येते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गुजरातमध्ये कोरोनाचे नवे 367 रुग्ण
मागील 24 तासात गुजरात राज्यामध्ये कोरोनाचे 367 नवीन रुग्ण आढळले असून, 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 15,572 झाली असून, मृतांची संख्या 960 झाली आहे.