ऑनलाईन टीम / लखनऊ :
बेकायदेशीर धर्मांतराचे देशव्यापी सिंडिकेट चालविल्याप्रकरणी उत्तरप्रदेश एटीएसने आज सकाळी मुझफ्फरनगर येथून मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केली. सिद्दीकी यांची एटीएसकडून चौकशी सुरू असून, विदेशातून त्यांच्या ट्रस्टला मोठा निधी उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे.
मौलाना सिद्दीकी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या आडून देशव्यापी धर्मांतरण सिंडिकेट चालवत होते. त्यासाठी त्यांना हवालाच्या माध्यमातून परदेशातून निधी देण्यात आला होता. लोकांवर प्रभाव पाडणे, शरीयत प्रणाली लागू करणे आणि लोकसंख्येचे प्रमाण बदलण्यासाठी ते मोठय़ा प्रमाणावर धर्मांतर करत होते. त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेता मौलानांवर बराच काळ लक्ष ठेवले जात असल्याचे एटीएस अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, मौलाना यांना बहरीनमधून दीड कोटींचा निधी आल्याचे चौकशीतून समोर येत आहे.