संगमेश्वर / प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथे संगमेश्वरमधील ज्येष्ठ व्यापारी श्रीराम उर्फ दादा वनकर यांना टेंम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वनकर गंभीर जखमी झाले आहेत.
धडक दिल्यावर चालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता त्याला शिंदेआंबेरी येथे पकडण्यात आले.वनकर यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.