राष्ट्रीय मल्लांचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
जय हनुमान कुस्तीगिर संघटना सावगाव आयोजित धुलीवंदनानिमित्त परशराम पैलवान सावगाव यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शुक्रवार दि. 18 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या मैदानात प्रमुख कुस्ती भारत केसरी, हरियाणा केसरी, प्रवीणकुमार दिल्ली, महान भारत केसरी, गंगावेस तालीम कोल्हापूरचा सिकंदर शेख यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती नानासाहेब मोहोळ कुस्तीकेंद्र पुणे यांचा मल्ल उदय खांडेकर वि. कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांच्यात, तिसऱया क्रमांकाची कुस्ती पुण्याच्या मंदार वावले वि. सिद्दय्या पुजारी मठपती आखाडा, चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित लहान कंग्राळी वि. आदी शिंदे पुणे यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार वि. किरण अष्टगी कलखांब यांच्यात, सहाव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी वि. पवन चिक्कदीनकोप्प यांच्यात, सातव्या क्रमांकाची कुस्ती सुशांत कंग्राळी वि. सोनु तनपुरे पुणे यांच्यात, आठव्या क्रमांकाची कुस्ती महादेव दऱयाण्णावर वि. राम धाहीगुळे पुणे यांच्यात, नवव्या क्रमांकाची कुस्ती हणमंत गंदीगवाड वि. निलेश खताळ पुणे, दहाव्या क्रमांकाची कुस्ती संकल्प कंग्राळी वि. विजय चिमट भांदुरगल्ली, अकराव्या क्रमांकाची कुस्ती पंकज चापगांव वि. संभाजी पवार पुणे, बाराव्या क्रमाकांची कुस्ती प्रवीण निलजी वि. संदीप यल्लाप्पूर यांच्यात होणार आहे. त्याचप्रमाणे विनायक गुरव व ओंकार शिंदे राशिवडे, ओंकार सांवगाव वि. दयानंद शिरोड, पार्थ कंग्राळी वि. ज्ञानेश्वर भांदुरगल्ली यांच्यात आकर्षक कुस्त्या होणार आहेत.