ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात 805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 482 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 207 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी 937 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 24 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4021 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 73 हजार 802 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 3904 आरटीपीसीआर टेस्ट आणि 6229 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.